Ad will apear here
Next
बंदिशी, भैरवीने आनंदली रविवारची सायंकाळ


पुणे : संतूरवर हळुवार छेडलेल्या तारा...  त्यातून उमटलेले मधुर स्वर... विलंबित बंदिशीने गाठलेली उंची... मारवा रागात आलाप, जोड, झाला यामधून झालेले पंडित राहुल शर्मा यांचे सादरीकरण... त्यानंतर कल्याण, बिहाग रागात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या बंदिशींनी संगीतप्रेमींची रविवारची (चार फेब्रुवारी) सायंकाळ आनंददायी ठरली.

निमित्त होते, भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित आणि कॉटनकिंग प्रस्तुत दोन दिवसीय नूपुरनाद महोत्सवाचे. रविवारी सायंकाळी पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन व पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने नूपुरनाद महोत्सवाची सांगता झाली. कोथरूडमधील आयडियल कॉलनीच्या मैदानावर भरलेल्या या महोत्सवात रसिक श्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
 
पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र पंडित राहुल शर्मा मंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पंडित शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडत विविध राग आणि ताल वाजवत श्रोत्यांची वाहवा मिळवली. मध्यलय, दृतलय तीन ताल... अन कौशी ध्वनीमधील धून सादर होताना पंडित राहुल शर्मा यांना श्रोत्यांची मिळालेली दाद अवर्णनीय होती. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात पंडित व्यंकटेश कुमार यांच्या सुमधुर गायनाने शांतीरसाची अनुभूती आली. त्यांनी सादर केलेल्या बंदिशीनी आसमंत दुमदुमला. ‘सजनी...’, ‘मुख मोर मोर...’ या सादरीकरणावर श्रोत्यानांही ठेका धरायला लावला. ‘आजा सावरिया...’ ही भैरवी सादर करत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर शिवराज पाटील व निवृत्ती धाबेकर यांनी, तर हार्मोनियमवर राहुल गोळे यांनी साथ केली.

प्रसंगी भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर, निनाद दैठणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, पुणेकर रसिकांसाठी हा महोत्सव विनामूल्य ठेवण्यात आला होता. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

‘शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असून, यातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडत आहे,’ असे डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXVBL
Similar Posts
पुरुषांसाठीच्या तयार कपड्यांचा ‘टायझर’ ब्रँड दाखल पुणे : ‘कॉटनकिंग’ आणि ‘लिननकिंग’ या ब्रँडसच्या निर्मात्यांनी आता ‘टायझर’ हा खास पुरुषांसाठीच्या तयार कपड्यांचा नवीन ब्रँड बाजारात सादर केला आहे. सर्वसामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या किंमतीत तयार कपडे उपलब्ध करण्याच्या हेतूने कंपनीने हा ब्रँड सादर केला असून पुण्यासह राज्यातील ३० पेक्षा अधिक दालनांच्या माध्यमातून
नूपुरनाद महोत्सव तीन व चार फेब्रुवारीला पुणे : येथील भैरवी संगीत प्रसारक मंडळातर्फे तीन आणि चार फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नूपुरनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भरतनाट्यम नृत्यांगना पद्मभूषण विदुषी अलारमेल वल्ली यांचे अनेक वर्षांनंतर पुण्यात सादरीकरण होणार आहे.
‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : नृत्य क्षेत्रातील विद्वान आणि साहित्यिक डॉ.पप्पु वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नृत्य कलाकार आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने केला आहे. या ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ जुलै रोजी ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती
स्वरदा ढेकणे अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन पुणे : विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेतून समजून घेण्यासाठी नृत्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध विद्वान आणि साहित्यिक डॉ. पप्पू वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आणि संकलन असलेले ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language